सावंतवाडी : चौकुळ गावातील भाजप पक्षाचे विश्वास सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी आमदार तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सावंतवाडी मतदारसंघ अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भाई भोसले, चंद्रकांत कासार आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

