मालवण | प्रतिनिधी : किर्लोस येथील उबाठा ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मालवण येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी खा. नारायण राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी प्रवेशकर्ते माजी ग्रापं सदस्य शशिकांत भावे, विद्यमान ग्रापं सदस्य सौं. मानसी भावे, यांसह सुदाम घाडीगावकर, किरण पांचाळ, जयवंत भावे, युवराज भावे, यशवंत नलावडे, काशीराम बागवे, विशाल भावे, सुप्रिया भावे, मेघा पांचाळ, कविता बागवे वनिता नलावडे, संध्या भावे उपस्थित होते.
भाजपा पदाधिकारी बाळा लाड, प्रविण घाडीगांवकर यांचे प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला. यावेळी जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, दया हाटले, राजेश तांबे, भाई घाडीगांवकर, बाळा परब, अरुण परब, रघुनाथ धुरी, घनश्याम चव्हाण, संतोष धुरी आदी विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.

