Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मुलीसह विवाहिता बेपत्ता ; नवऱ्याची पोलिसात तक्रार

मुलीसह विवाहिता बेपत्ता ; नवऱ्याची पोलिसात तक्रार

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-नवीवाडी येथील वर्षा मनोज गावडे (वय 34) ही विवाहिता आपल्या ५ वर्षीय मनश्री या मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबत तिचे पती मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पिंगुळी नवीवाडी येथील मनोज गावडे यांनी त्यांची पत्नी वर्षा गावडे व पाच वर्षीय मुली मनश्री हिला नवीवाडी येथून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे काल ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोडले होते. त्यांची पत्नी वर्षा हिने सांगितले की, मला ब्युटी पार्लरला जायचा आहे. मुलीचा ड्रेस आणायचा आहे. पती मनोज गावडे यांनी आपल्या पत्नीला व मुलीला म्हापसेकर तिठा येथे सोडले. काही वेळानंतर मनोज गावडे यांनी पत्नीला फोन लावला असता तिने उत्तर दिले नाही. त्यामुळे ज्या पार्लरमध्ये ती गेली होती तिथे चौकशी केली असता पार्लरमधून ती निघाल्याचे सांगण्यात आले. पुन्हा फोन लावला असता उत्तर दिले नाही. नंतर शोधाशोध केली असता

ती सापडून आली नाही. अखेर मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आपली पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

rapan bottom