Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

वराड गावातील युवकांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

वराड गावातील युवकांनी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

मालवण : मालवण तालुक्यातील वराड गावातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून माजी आमदार. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. यावेळी माजी. आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ. वैभव नाईक हे सर्व सामान्य जनतेमध्ये वावरुन सर्वसामान्यांच्या वेळप्रसंगाला धावुन जाणारे आमदार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आ.वैभव नाईक सातत्याने करतात. एक हक्काचे आमदार म्हणून आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असून त्याच विश्वासातून आम्ही ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहोत.असे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.

यावेळी ओमकार रावले, हर्षद मिठबावकर, कुणाल मिठबावकर, ओमकार फोपळे, अभिषेक टेमकर, पंकज म्हाडगुत या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी कट्टा ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम, रुपेश आमडोसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom