कुडाळ मालवण मधे मनसेची मते निर्णायकच ठरतील : उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर.
मालवण : लोकसभा निवडणुकीत राजसाहेबांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार खा.नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी मनसेचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकित मनसेची भूमिका ही निर्णायक ठरेल. विधासभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार नसताना सुद्धा अनेक तरुण मनसेत प्रवेश करत आहेत त्याचेच हे एक उदाहरण म्हणजे आजचा हा प्रवेश आहे. कारण आजच्या तरुण पिढीला राज ठाकरे या नेतृत्त्वावर विश्वास आहे भविष्यात राज ठाकरेच या महाराष्ट्राच भविष्य घडवू शकतात या गोष्टीवर आजच्या तरुण पिढीचा ठाम विश्वास आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मनसे ची भूमिका ही निर्णायक असेल यात कोणतेही दुमत नाही.
येत्या काळात सुद्धा कुडाळ-मालवण मतदार संघाचा आमदार कोणी झाला व सत्तेत कोणी असले तरी जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनावर वचक ही मनसेचीच राहील.

