Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

माणुसकीचं पारदर्शक नातं म्हणजे निलेश राणे!

माणुसकीचं पारदर्शक नातं म्हणजे निलेश राणे!

राणेंच्या विजयाचा निर्धार जनतेनेच केला आहे

शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मालवण : निवडणूका येतात जातात, काही चेहरे उगवतात मावळतात, पण या सगळ्या राजकारणाच्या निमित्ताने काही चेहरे जनतेसमोर येतात, जे कायम जनतेच्या हृदयात जाऊन बसतात. त्यातलाच एक झळझळीत चेहरा आहे निलेश नारायण राणे, हे नाव नाही तर सर्वसामान्य जनतेचा ब्रँड म्हणुन निवडणूकीत उतरले आहेत, असे शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हंटले आहे.

"खोटं बोला पण रेटून बोला" याची मास्टरी उबाठा शिवसेनेकडे आहे, आणि विनायक राऊत, वैभव नाईक हे या लाय-स्कुलचे स्कॉलर आहेत. यापूर्वीच्या पहिल्या लोकसभा निवडणूक टर्ममध्ये या लोकांनी निलेश राणे आणि नारायण राणे अशाच खोट्याची महापूजा घालत दोन्ही कोकण पुत्रांना विनाकारण प्रचंड बदनाम केले. पण खोट्याचे आयुष्य प्रभावी पण छोटे असते. आज घराघरात पोहोचलेल्या निलेश राणेंना जनता जेव्हा ओळखायला लागली, गैरसमजांचे आकाश मोकळे झाले आहे. जनतेने आपल्या हिमालयाएवढ्या चुकीला पुन्हा मजबूत दुरुस्तीत रूपांतर करायला सुरुवात केली आहे, आणि मागील निवडणुकीत विनायक राऊत यांची खासदारकी अस्सल कोकणी खोडरबर वापरत खोडून काढली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आली रे आली आता तुझी बारी आली! वैभव नाईक यांची आमदारकी जनता फक्त खोडून काढणार नाही, तर त्याच्या खुणाही पार पुसून टाकणार आहे. दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाला पन्नास वर्षे मागे नेणाऱ्या वैभव नाईक नावाच्या बिनकामी आमदाराचे नामोनिशान पुसून टाकण्यासाठी जनता सज्ज आहे. विकास म्हणजे काय असतो, जनतेशी हृदयातले नाते कसे असते, वैभव नाईकांसारखी गोडबोली बनवेगिरी न करता जे पोटात तेच ओठात ठेवणारा एक सच्चा पारदर्शी माणूस कसा असतो आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी निधी खेचून आणण्याची हिंमत आणि धमक कशी असते हे दाखवणारा नेता आज जनतेला मिळाला आहे, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

आजवर वाघाचे कातडे पांघरून वावरणाऱ्याला आता खरा जातिवंत वाघ भेटला आहे. आगे आगे देखो होता है क्या! कुडाळ मालवणचा विकास होण्याच्या जनतेच्या हक्कापासून आता कोणाचाही खोटारडेपणा आणि अफवांचा बाजार निलेश नारायणराव राणे या नावाला अडवू शकत नाही, असे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा माजी सचिव किसन मांजरेकर यांनी म्हटले आहे.

rapan bottom