Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे खा. नारायण राणे यांच्या हस्ते उदघाटन

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन मालवण शहरातील मेढा दैवज्ञ भवन नजीक येथे माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आर पी आय (आठवले गट) महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले या कार्यालयाची विजयाची ख्याती आहे. या निवडणुकीतही ति दिसून येईल. प्रत्येक बूथवर मोठी आघाडी असेल. महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला. तर येथील आमदार दहा वर्षात निष्क्रिय ठरला असे सांगत खा. नारायण राणे यांनी येथील समस्यांना पाढा वाचला.

यावेळी निलेश राणे म्हणाले महायुती जोमाने काम करत आहे. ही ताकद मोठा विजय निश्चित करणारी आहे. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. मोठया विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, रणजित देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत,युवासेना पदाधिकारी प्रितम गावंडे, युवासेना पदाधिकारी प्रितम गावंडे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, भाजपा शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, राजन गांवकर, आबा हडकर, अभय कदम, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, पेडणेकर, राकेश सावंत, अमित गावंडे, महेश गांवकर यांसह भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.

rapan bottom