आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती
काळसे : मालवण तालुक्यातील काळसे गावातील परबवाडी व रमाईनगर मधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य सुशिल काळसेकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
आमदार वैभव नाईक यांनी काळसे गावामध्ये लाखो रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत.त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन आपण त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे.
यावेळी परबवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्ते राजेश परब, रोहित परब, रोहन परब, समीर परब,तुळशीदास परब, संदेश परब, गौरेश परब, चिन्मय परब, प्रविण परब, सुधीर प्रभु, गोविंद खानोलकर, परशुराम परब, बुधाजी परब,पांडुरंग परब,प्रशांत प्रभू,जितेंद्र बागवे,रमेश परब,दीपक प्रभू,विश्वनाथ परब,जनार्दन परब,चंद्रकांत बागवे, प्रमोद परब,मालती परब, संतोष परब, भावेश परब,अवधूत परब अनिल परब तर रमाईनगर येथे ग्रामपंचायत सदस्य सुशील काळसेकर, मनोहर काळसेकर, प्रशांत काळसेकर,रुपेश काळसेकर, सुनील काळसेकर, अक्षय परुळेकर,अक्षय काळसेकर, अजय काळसेकर, आनंद काळसेकर,विवेक काळसेकर,दीपक काळसेकर, महेश काळसेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज,पेंडूर विभाग प्रमुख शिवा भोजने,बाबू टेंबुलकर,रुपेश आमडोसकर, दर्शन म्हाडगुत, शेखर रेवडेकर निनाक्षी शिंदे,दिपक बागवे,ग्रामपंचायत सदस्य मोनिका म्हापणकर, चंद्रकांत राऊळ, शाखाप्रमुख विनोद परब,उपविभाग प्रमुख उमेश प्रभू,राजेश परब,शिवनंदन प्रभू,अण्णा गुराम,अजित प्रभू,सुनील परब,शंकर परब ग्रा. सदस्य भाग्यश्री काळसेकर, दीपिका म्हापणकर,जागृती भोळे,हेमंत गुराम, संतोष कदम,प्रभाकर गोसावी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

