Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

धनगर समाजाने वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये...

धनगर समाजाने वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये...

निलेश राणे यांनी अडीज वर्षात तांडावस्ती विकास कार्यक्रमातुन दिला धनगर समाजासाठी ४ कोटींचा निधी

समाज काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर उभा राहील : भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे

कुडाळ : वैभव नाईक यांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी बोगस पक्ष प्रवेशाचा एककलमी कार्यक्रम सुरु केला असून कुडाळ मतदारसंघातील एक दोन व्यक्तींचे पक्षप्रवेश घेत ते संपूर्ण गावच आपल्या सोबत असल्याचा दिखावा करत आहेत. आज कसाल धनगरवाडी येथे झालेला पक्षप्रवेश त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. केवळ आपले अस्तित्व दाखवण्यासाठी ज्या लोकांचा राजकारणाशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाही अश्या लोकांचा वैभव नाईक पक्षप्रवेश दाखवत आहेत. ज्या धनगर समाजातील लोकांचा वैभव नाईक यांनी पक्षप्रवेश दाखवला त्या धनगर समाजासाठी वैभव नाईक यांनी गेल्या दहावर्षात काय केलं हा संशोधन विषय असून त्यांनी दहा पैकी सात वर्षे सत्तेत असूनही धनगर समाजाचा तांडावस्ती विकासाचा एक रुपयाही मतदारसंघात आणला नाही अशी टीका नवलराज काळे यांनी केली आहे.

राज्यात युतीच सरकार आल्यानंतर पहिल्यांदा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या मागणीनुसार तांडावस्तीचा निधी निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आला आता पर्यंत तब्बल ४ कोटींचा निधी धनगर समाजाच्या वाडी वस्तीवर जाणारे रस्ते पाणी लाईट व्यवस्था यासाठी निलेश राणे यांनी मंजूर केला. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल बांधकाम योजनेतून आता पर्यंत १५ पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांची घरकुल की पालकमंत्रांनी रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाली. त्यामुळे आमचा पूर्ण धनगर समाज हा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी ठाम राहील. वैभव नाईक यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केलं आहे.

rapan bottom