Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जनतेची दिशाभूल करणे हेच आ. वैभव नाईक यांचे काम

जनतेची दिशाभूल करणे हेच आ. वैभव नाईक यांचे काम

सुकळवाड येथील म्हसकर, भालेकर यांचा पक्षप्रवेश केवळ दिखावा ; ते वैभव नाईकांसोबतच होते

भाजपा सुकळवाड विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांनी सुनावले

निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित : व्यक्त केला विश्वास

मालवण : जनतेची दिशाभूल करण्याचेच काम आ. वैभव नाईक यांनी नेहमीच केले. आता निवडणुक तोंडावर काही पक्षप्रवेशाचा दिखावा त्यांच्या माध्यमातून सुरु आहे. यातील बहुतांश हे उबाठा सोबतच अनेकवेळा दिसून आले. त्यांचेच प्रवेश घेण्याचे काम सुरु आहे. सुकळवाड येथील प्रसाद भालेकर यांचाही प्रवेश तसाच आहे. हा वैभव नाईक यांचाच कार्यकर्ता आहे. तर सुभाष म्हसकर भाजपचा माजी उपसरपंच होता परंतु तो अनेक वर्षे राजकारणात सक्रिय नाही आणि तो या अगोदर सुध्दा विरोधीच काम करत होता. असा हल्लाबोल भाजपा सुकळवाड विभाग अध्यक्ष चेतन मुसळे यांनी केला आहे.

महायुती भक्कम आहे. महायुती मध्ये सुकळवाड गावांमध्ये लोकसभेला जे वातावरण होते त्याहीपेक्षा अधिक चांगले वातावरण आता झाले आहे. सुकळवाड गावातुन जे लीड लोकसभेला राणे साहेबांना दीले त्याहीपेक्षा जास्त लीड निलेश राणे यांना मिळणारच यासाठी सर्वजण एकसंघपणे कार्यरत आहेत. सुकळवाड गावातील मतदार हे निलेश राणे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. भारतीय जनता पक्षाचे सुकळवाड गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे निलेश राणे साहेब यांचे एकमताने आणि एकदीलाने काम करत आहेत. महायुती मजबूत आहे. असे असल्याने पराभवाची चाहूल दिसू लागल्याने आ. नाईक दिशाभूल प्रवेश घेत आहेत.

वैभव नाईक यांच्याकडून अमिश दाखवून मतदार फोडण्याचेही काम चालू आहे. परंतु ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत. निलेश राणे साहेब यांचा विजय हा मोठया मताधिक्याचा आणि लक्षवेधी असेल. असा विश्वास चेतन मुसळे यांनी व्यक्त केला.

rapan bottom