Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

ठाकरे शिवसेनेत प्रवेश ; सुकळवाड मधील भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल

ठाकरे शिवसेनेत प्रवेश ; सुकळवाड मधील भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हसकर यांनी हाती घेतली मशाल

सुकळवाड : मालवण तालुक्यातील सुकळवाड गावातील कट्टर राणे समर्थक भाजपचे माजी उपसरपंच सुभाष म्हस्कर व भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर तसेच तळगाव मधील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत व त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे. आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे.
आ. नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन सुकळवाड गावातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते सुकळवाड व तळगाव गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्ते यांनी व्यक्त केला आहे.

     यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी सुकळवाड-तळगाव  मधील प्रवेशकर्त्यांना दिला आहे.

   यावेळी सुकळवाड गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते प्रसाद भालेकर, ऋषिकेश तारवे, राजेश वायंगणकर, जगन्नाथ हिंदळेकर तर  तळगाव गावातील सहदेव दळवी, महादेव मेस्त्री, लक्ष्मण दळवी, शशिकांत गावडे या प्रवेशकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. 

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले विभाग प्रमुख विजय पालव, प्रज्ञा चव्हाण, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, रुपेश वर्दम,बाबली पालव,तळगाव सरपंच लता खोत, सुकळवाड उपसरपंच सचिन पावसकर, गावराई उपसरपंच संतोष सामंत,तळगाव माजी उपसरपंच अनंत चव्हाण,प्रसाद दळवी,सुकळवाड शाखाप्रमुख प्रल्हाद वायंगणकर,ग्रा.सदस्य वृषाली गरुड, ग्रा.सदस्य अविनाश गरुड,सुनील पाताडे,प्रशांत केळवलकर,समीर वायंगणकर,गोपाळ वांगणकर,मोरेश्वर मसुरकर,अनिल पालकर,दादा पाताडे भाऊ पाताडे,हेमंतकुमार पाताडे, उमेश पाताडे,भरत केळवलकर,प्रसाद मुसळे,अक्षय राणे,संतोष गरुड,अर्जुन अटक, स्वप्निल घोगळे,वैभव घोगळे आदि शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom