Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

वारंगाची तुळसुली येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

वारंगाची तुळसुली येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांची उपस्थिती

कुडाळ : कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल आ.वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.


आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते वारंगाची तुळसुली गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


यावेळी बोलताना धाकू जाधव म्हणाले की राणे साहेब स्वतः खासदार असून देखील त्यांनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना विधानसभेत उमेदवारी दिली आहे. आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगितले.


यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत वारंगाची तुळसुली गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांना दिला आहे.


यावेळी धाकू जाधव,निलेश जाधव, सत्यवान जाधव,संतोष जाधव,रामा जाधव,संतोष जाधव,महेश जाधव, मयूर चव्हाण,अनिल चव्हाण,भिसाजी जाधव,दत्तू कदम,छाया जाधव पूजा कदम,प्रियंका जाधव,अशोक जाधव, रामा जाधव संतोष जाधव व शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.


याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,विभाग प्रमुख गुरु सडवेलकर,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर,घावनळे विभाग प्रमुख पप्पू महाडेश्वर,तुळसुली शाखाप्रमुख उदय तुळसुलकर, मांडकुली सरपंच तुषार सामंत,बाबा वारंग,आनंद वारंग,प्रमोद मेस्त्री, केरवडे उपशाखाप्रमुख संतोष परब, राकेश तुळसुलकर,विजय उमळकर संचित ठाकूर,सागर जाधव,सिद्धेश धुरी,अभी मराठे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom