Monday, 02 November 2026
Latest News
लायन्स क्लब मालवणचा जनजागृतीपर उपक्रम! तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! लायन्स क्लब मालवणचा जनजागृतीपर उपक्रम! तळगावच्या श्री रामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकतेचे धडे! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय !
ruchira top

लायन्स क्लब मालवणचा जनजागृतीपर उपक्रम!

लायन्स क्लब मालवणचा जनजागृतीपर उपक्रम!


जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रा. सौ. घोगल यांचे महिलांना मार्गदर्शन

मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन


मालवण | प्रतिनिधी : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब मालवणच्या वतीने महिलांसाठी मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी दैनंदिन जीवनातील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात प्राध्यापिका सौ. घोगल यांनी 'महिलांनी मानसिक आरोग्य कसे जपावे?' या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या आयुष्यात मानसिक स्वास्थ्याचे असलेले महत्त्व, कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना मानसिक संतुलन राखण्याची गरज तसेच स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे महत्त्व या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असून, महिलांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने लायन्स क्लब मालवणच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला बहुसंख्य महिलांची उपस्थिती लाभली.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, गणेश प्रभुलकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी, राजा शंकरदास, मीना घुर्ये, फॅनी फर्नांडिस, रूपा कांदळगावकर तसेच नगरसेविका अश्विनी कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांच्या मानसिक आरोग्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती घडवून आणण्यासाठी लायन्स क्लब मालवणने राबविलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.

rapan bottom