Sunday, 01 November 2026
Latest News
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास हेच लक्ष : नगराध्यक्षा ममता वराडकर


विकास कामांवरून दिशाभूल करतं नौटंकी करणाऱ्या उबाठा गटाची केली पोलखोल

नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनीही नळपाणी योजनेची मांडली वस्तुस्थिती

उबाठा गटाकडून जनतेची सुरु असलेली दिशाभूल केली उघड

मालवण | प्रतिनिधी :
आमदार निलेश राणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मालवण शहराचा सर्वांगीण, गतिमान आणि दर्जेदार विकास साधणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने मोठा विकासनिधी प्राप्त होतं आहे. अनेक विकासकामे सुरु आहेत. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला, तरी मालवणच्या विकासाचा वेग मंदावणार नाही. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकाला, पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत मालवणला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असा निर्धार नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान शहरातील महत्त्वाकांक्षी नळपाणी योजनेबाबत अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या उबाठा गटाच्या राजकीय नौटंकीचा खरपूस समाचार नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी घेतला. विकासकामांबाबत खोटे आरोप करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न असल्याचे सांगत विरोधकांच्या खोट्या दाव्यांची पोलखोल कांदळगांवकर यांनी करून नळपाणी योजनेची वस्तुस्थिती तारखा व आकडेवारीसह स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

बंदर जेटी येथील स्वच्छतागृह येथे असणाऱ्या काही असुविधा दुरु करून सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने नगरपरिषद माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. जवळच बोअरवेल उभारून पाणीपुरवठाही केला जाणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून कामे होणार आहेत ही माहिती मिळताच स्वच्छतागृहातील असुविधा या विषयावरून उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी यांनी जनतेची दिशाभूल करून नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सुरु असलेल्या कामांची माहिती देत उबाठा गटाची नगराध्यक्षा यांनी पोलखोल केली. अनेक वर्षा पासून यां ठिकाणी समस्या आहेत त्यावेळी आमदार कोण होते? याचेही आत्मपरीक्षण उबाठा गटाने करावे. मात्र आम्ही सर्व शिवसेना महायुती नगरसेवक जनतेच्या समस्या साठी नेहमीच तत्पर असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विकासनिधीतून मालवण शहरातील बंदर जेटी, दांडी आणि चिवला बीच या प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी सुसज्ज प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
मालवण नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजु बिडये, उपनगरध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, उद्योजक मोहन वराडकर, युवासेना शहर प्रमुख रोहन आचरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी महेश कांदळगावकर म्हणाले, सुधारित नळपाणी योजने बाबत विरोधकांकडून फक्त गैरसमज पसरविले जात आहेत. सदर नळपाणी योजना माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात म्हणजेच २०१६ ते २०२१ या कालावधीत मंजूर झाली होती. योजनेसाठी प्रथमत: २८ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली होती. निविदा ५० ते ६० टक्के वाढीव असल्याने शासनाने योजनेचे फेरमूल्यांकन करा व प्रस्ताव पाठवा असे सांगितले होते. या दरम्यान २०२१ मध्ये आमचा कार्यकाळ संपला. त्यानंतर २०२२ मध्ये फेरमूल्यांकन नवीन निविदा काढण्यात आली. त्यावेळी नगरपालिकेवर प्रशासन कार्यरत होते. मधल्या तीन वर्षाच्या काळात या योजनेची पुढील कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र आमदार निलेश राणे हे निवडून आल्यावर लगेचच या योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, व कामास खऱ्या अर्थाने गती मिळाली. असेही महेश कांदळगावकर म्हणाले.

आता उबाठा गट दिशाभुल करत आहे. नळपाणी योजनेच्या टाक्या राजकोट व रेवतळे येथे होत्या त्या कुंभारमाठ येथे हलविल्याचा गैरसमज विरोधक पसरवीत आहेत. २०२२ साली झालेल्या योजनेच्या प्रस्तावात राजकोटसाठी पाण्याची टाकी ही उच्च भाग असलेल्या कुंभारमाठ येथेच दाखविण्यात आली होती. कुंभारमाठ येथून राजकोट पर्यंत थेट स्वतंत्र पाईपलाईनद्वारे उच्च दाबाने मुबालक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे राजकोट येथे कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे कांदळगावकर यांनी सांगितले. तसेच रेवतळे टाकी नवीन आराखड्यानुसार तेथील जमिनीत पाणी जास्त असल्याने, दलदल असल्याने तसेच ओहोटीची समस्या असल्याने तेथे टाकी उभारण्यास योग्य लेव्हल नसल्याने ती टाकी कुंभारमाठ येथेच उभारण्यात येणार आहेत. राजकोट व रेवतळे साठीच्या दोन्ही टाक्या कुंभारमाठ येथे उभारण्यात येणार आहेत, कुंभारमाठ हे उंचावर असल्याने चांगल्या ग्रॅव्हीटीने पाणी मिळू शकते असा अहवाल आहे. हे काम पीएमसीच्या मार्गदर्शनाखालीच करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

तसेच नळपाणी योजनेच्या यां सर्व कामाबाबत नगरपालिकेच्या विशेष सभेत जो ठराव केला गेला, तो ठराव शासनाकडे पाठवला असून तो मंत्रालयातील मुख्य अभियंत्याकडे जाणार असून त्यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मालवणच्या जनतेने विरोधकांच्या आरोपावरून कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, जनतेने आमदार निलेश राणे तसेच आम्हा नगरसेवकांवर जो विश्वास ठेवला आहे त्याला पात्र राहूनच आम्ही काम करतं आहोत. असेही महेश कांदळगावकर यांनी सांगितले.

तसेच नळपाणी योजनेच्या कामावरील ठेकेदार व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्सीच्या प्रमुख हे भाऊ- बहीण असल्यावरून विरोधक नाहक टीका करत आहेत. भाऊ - बहिणीने एकत्र काम करू नये असे कुठेही नाहीय. कामाचा दर्जा महत्वाचा. या कामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटन्सी ही २०२२ सालीच नेमण्यात आली होती. त्यावेळी आम्ही पण नगरपालिकेत नव्हतो तसेच निलेश राणे देखील आमदार नव्हते. त्यावेळी विरोधकांना पीएमसी नेमताना भाऊ - बहिणीचे नाते दिसले नाही काय ? की आता फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे कांदळगावकर यांनी सांगत विरोधकांनी उगाच कोणतेही तर्क लावून गैरसमज पसरवू नये, काम नियमनुसार आणि दर्जेदार यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले.

rapan bottom