Sunday, 01 November 2026
Latest News
विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार विरोधकांच्या खोट्या दाव्यांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्याकडून चिरफाड! महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत खोटे बोला रेटून बोला हेच उबाठा गटाचे काम भावपूर्ण श्रद्धांजली | कै. रामचंद्र विठ्ठल सावंत दांडी परिसरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; ५ लाख ३८ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार
ruchira top

महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत

महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ हा स्तुत्य उपक्रम-प्रभाकर सावंत


वेंगुर्ला | प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्रात महिला वर्ग स्वत:चे व्यवसाय करीत आहेत. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वेंगुर्ल्यातील महिलांनी एकत्र येत लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेश ही संस्था स्थापन करीत महिलांसाठी व्यावसायीक व्यासपिठ निर्माण केले आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अशाप्रकारचे उपक्रम प्रत्येक शहरात व्हावेत. अशा उपक्रमांना आमचे नेहमी सहकार्य राहील असे आश्वासन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाला दिलेल्या भेटीप्रसंगी महिलांनी दिले.
वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिकांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध उत्पादने आणि खाद्यपदार्थ विक्रीचे भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव सुरू आहे. या उपक्रमाला ३१ ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई,भाजपाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पपू परब, वायंगणी उपसरपंच अनंत केळजी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भगत, बाळा सावंत, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्ष ज्योती देसाई, सदस्य शुभदा नवार, दिपाली अभ्यंकर, काजल गिरप, इरनव्हील क्लबच्या ट्रेझरर वृंदा गवंडळकर, आरती गिरप, रसिका मठकर आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष पपू परब, वायंगणी उपसरपंच अनंत केळजी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिपक भगत आणि बाळा सावंत यांचा इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार फाऊंडेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंत्रालयाच्या ठिकाणी महिलांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार प्रसन्ना देसाई यांनी मानले.

rapan bottom