तेंडोली ठाकरे शिवसेना युवासेना विभाग प्रमुख कौशल राऊळ
निलेश जोशी | कुडाळ : तेंडोली येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते महायुतीत प्रवेश झाला. असे काही विरोधक दाखवण्याचा भास करत आहेत. मुळात हे कार्यकर्ते बीजेपी कार्यकर्ते आहेत. नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्थानिक पातळीवरती नक्की कार्यकर्ते कोणाची याची यादी पडताळणी करावी. नंतर त्यांचा शिंदे गटात प्रवेश घ्यावा. आताची जनता सुज्ञ आहे योग्य वेळी योग्य उत्तर जनता मतदान पेटीतूनच देतील. असे तेंडोली युवासेना विभाग प्रमुख कौशल राऊळ सांगितले आहे.
श्री राऊळ म्हणाले आमदार वैभव नाईक यांनी तेंडोली गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे केली असुन शिवसेना विभागप्रमुख संदेश प्रभु, सरपंच सौ अनघा तेंडुलकर, जेष्ठ शिवसैनिक संदीप राऊळ यांच्या माध्यमातून अनेक कामे झालेली आहेत आणि ज्या भाजपा कार्यकर्ता यांचा प्रवेश दाखवला त्या पैकी तीन जणांचे मतदान नाही आहे हे या लोकांना माहीत नाही ही खंत आहे.तेंडोली गावात आमदार वैभव नाईक यांची कामे बोलतात. असेही श्री राऊळ यांनी सांगितले.

