Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई करावी

अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई करावी

मालवण येथील तरुणांचे पोलिसांना निवेदन

मालवण : मालवण बस डेपो समोर एक फळ विक्रेता गुटखा खाऊन फळांवर थुंकताना सापडला, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच मालवण पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत नोंद असलेल्या तसेच अधिकृत परवाने असणाऱ्या व्यक्तींना वगळता सर्व अनधिकृत फळ विक्रेत्यांवर सरसकट कारवाई करण्यात यावी, असे निवेदन मालवण मधील तरुण सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने मालवण पोलीस स्टेशनमध्ये तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनासही देण्यात आले आहे.

घडलेल्या प्रकारामुळे फळ विक्रेत्यांवरील नागरिकांची विश्वासार्हता तर कमी झाली आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न उदभवला आहे.

फळ विक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर आपली हातगाडी लावून फळे विकतात, त्यामुळे सततच्या वाहतूक कोंडीच्या त्रासाला मालवणवासियांना सामोरे जावे लागते. अधिकृत फेरीवाले किती ह्याची कोणालाच माहिती नसते, घडलेला प्रकार हा संतापजनक आहे, भविष्यात असे प्रकार घडत राहिल्यास नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येतील, त्याआधीच आपण फक्त अधिकृत नोंद असलेल्या तसेच मालवण पोलीस स्थानकात ज्या व्यक्तींची नोंद आहे अशा अधिकृत परवाने असणाऱ्या व्यक्तींना वगळता सर्व अनधिकृत फळविक्रेत्यांवर सरसकट कारवाई करावी. मात्र हि कारवाई 'मी मारतो तू लागल्यासारखं कर' अशी असू नये तर कठोर स्वरूपात असावी जेणेकरून असले प्रकार पुन्हा होणार नाहीत व मालवणातील रस्ते देखील वाहतूक कोंडीतून मुक्त होतील असे मागणी निवेदन मालवण पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहे. तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनासही देण्यात आले आहे.

rapan bottom