महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात मेळावा होणार संपन्न
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार 5 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात संपन्न होणार आहे. अशी माहिती भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

