मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर यांच्या पालखी सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांनी श्री मोरयाचा धोंडा येथे देवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, नितीन राउळ, दत्ता पोईपकर, तृप्ती मयेकर, निनाक्षी शिंदे मेथर, संदीप लाड यांसह शिवसैनिक व समस्त मालवण वसीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवणच्या ग्रामदैवता पालखी सोहळ्यात आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन
