Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

नगरपरिषद कर्मचारी, नगराध्यक्ष ते शिवसेना जिल्हा संघटक अशी यशस्वी वाटचाल

नगरपरिषद कर्मचारी, नगराध्यक्ष ते शिवसेना जिल्हा संघटक अशी यशस्वी वाटचाल

महेश कांदळगावकर यांची शिवसेना जिल्हा संघटक पदी नियुक्ती

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद कर्मचारी ते लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी वाटचाल करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा यशस्वी ठसा उमटवणारे मालवणचे अभ्यासू नेतृत्व महेश कांदळगावकर यांची
शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदार संघातील पाच तालुक्याचा कार्यभार त्यांच्याकडे देताना एक मोठी जबाबदारी त्यांना पक्षाने दिली आहे. मालवण नगरपरिषद कर्मचारी, नगराध्यक्ष ते शिवसेना जिल्हा संघटक हा महेश कांदळगांवकर यांचा प्रवास नवी शिखरे सर करणारा ठरला आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना पक्ष निरीक्षक दीपक वेतकर, बाळा चिंदरकर, उपनेते संजय आंग्रे , जिल्हाद्यक्ष दत्ता सामंत यांच्या शिफरशी नुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

मालवण येथे महायुतीचे शिवसेना उमेदवार माजी खासदार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी महेश कांदळगावकर यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महेश कांदळगांवकर यांनी मालवण नगरपरिषद एक अभ्यासू व हुशार व्यक्तिमत्व अशी ओळख प्राप्त करताना एक कर्मचारी म्हणून जबाबदारी पूर्ण केली. त्या नंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्ह्णून त्यांनी पाच वर्षे कार्यकाळ पुर्ण केला. मालवण शहर विकास हेच व्हिजन आणि हाच ध्यास त्यांच्या कार्यपद्धतीतुन दिसून आला. निलेश राणे यांनीही त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. आता महेश कांदळगांवकर यांच्याकडे पक्षाने संघटक पदाची जबाबदारी दिली आहे.

rapan bottom