मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती : नागरिकांनाही केले आवाहन
मालवण : मालवण बस स्थानक समोर फळ विक्री करणाऱ्या त्या फळविक्रेत्या विरोधात नागरिकांच्या संतप्त भूमिके नंतर तसेच समाजमाध्यमातूनही संतापाचा सुरु येत होता. दरम्यान त्या ठिकाणाहून पळून गेलेल्या फळ विक्रेत्याला मालवण पोलिसांनी काही वेळातच ताब्यात घेतले. चौकशी अंती त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. योग्य ती समज दिली. त्यानंतर तो फळ विक्रेता याने आपण मालवण सोडून गावी जातो असे सांगितले. त्याच्या सोबत त्याचा भाऊही निघून गेला आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
मालवण पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, मालवण येथील फळविक्रेता प्रकरण मध्ये चौकशी करून संबंधित व्यक्ती वर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. याद्वारे नागरीकांना अवाहन करण्यात येते कि, सोशल मिडीयावरती जातीय किंवा धार्मीक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये. कोणत्याही धर्मविषयीं जाणीवपूर्वक द्वेष अथवा गैरसमज पसरवू नये. जातीय किंवा धार्मिक सलोखा बिगडेल असे कृत्य करू नये. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे मनाई आदेशाचा भंग करू नये. व्हाट्सअप ग्रुप ऍडमिन यांनी आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट तात्काळ डिलीट करून संबंधित व्यक्तींना याबद्दल समज द्यावी. अन्यथा सदर बाबत व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल. जो कोणी जातीय धार्मीक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था भंग करणारी कृती करेल अशा व्यक्ति विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शांतता राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

