Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नका !

गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नका !

आमदार वैभव नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

निलेश जोशी | कुडाळ : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना बंदूक गरजेची आहे. त्यामुळे गुन्हे दाखल नसलेल्या शेतकऱ्यांच्या परवानाधारक बंदुका जमा करू नयेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर जिल्हाधिकाऱयांनी तोंडी आदेश दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडील शेती संरक्षण बंदूका जमा करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. वन्यप्राणी लोकवस्ती मध्ये घुसून सैरावैरा पळत आहेत. शेतीचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे हवेत गोळीबार करून वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी बंदूक गरजेची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही समस्या आ.वैभव नाईक यांच्याजवळ मांडली असता आ.वैभव नाईक यांनी याची तात्काळ दखल घेत आज जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी असतील त्या बंदुका पोलिसांनी जप्त कराव्यात मात्र कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या शेती संरक्षण बंदुका जमा न करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी केली.


यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सध्या भात कापणीचा हंगाम चालु झाला असून वानर,माकड, गवारेडे, डुक्कर भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तर वानर नारळ बागांचे नुकसान करतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेती संरक्षण बंदूका जमा केल्यास शेतीचे आणि फळ बागायतीचे अतोनात नुकसान होणार असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तोंडी आदेश देत ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील त्या बंदुकाच पोलिसांनी जप्त कराव्यात व कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बंदुका जमा न करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

rapan bottom