Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

शेती हंगामाचा विचार करता शेतीसंरक्षण बंदूका जमा करण्यास शिथिलता मिळावी

शेतकऱ्यांमधून मांडली जात आहे भुमिका

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती हंगाम सुरु आहे. भात, भुईमूग, चवळी आदी शेतीपीक घेतले जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गवेरेडे, डुक्कर व अन्य जंगली प्राणी शेतीचे मोठे नुकसान करत आहेत. या जंगली प्राण्यांना पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना शेती संरक्षण बंदूका दिल्या जातात. मात्र सध्यस्थितीत ऐन शेती हंगामात या बंदूका जमा करण्याचे आदेश शेतकऱ्यांना प्रशासनाने दिले आहेत. निवडणुक पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय असला तरी याचा परिणाम शेती हंगामावर होऊ शकतो. नेहमी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणारे, कोणतेही गुन्हे दाखल नसलेले व राजकारण या पासूनही दूर असलेले अनेक शेतकरी यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेत पिके बहरात आली आहेत. त्यात पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. तर जंगली प्राणी शेतीत घुसून नुकसान करत आहेत. त्यांना पळवून लावण्यासाठी हवेत गोळीबार करण्यासाठी शासन नियमानुसार शेतकरी बंदूका वापरतात मात्र या बंदूका जमा केल्यास त्याचा परिणाम शेती संरक्षण करण्यावर होणार आहे. प्रशासनाने याबाबत विचार करावा. शेतकऱ्यांच्या शेतीच्या दृष्टीने विचार झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा ठरेलं. शेतकऱ्यांची भुमिका निवडणुक विभाग, वरिष्ठ प्रशासन यापर्यत पोहचवावी. ते निश्चितच सकारात्मक विचार करतील. अशी भुमिका काही शेतकरी यांच्या वतीने चर्चेतून मांडली आहे.

rapan bottom