Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

अपहरण आणि मारहाण प्रकरणी दोघांना अटक ; चार फरार ; एक कारही ताब्यात

पैशाच्या देवाणघेवाण विषयावरून झाली होती मारहाण

निलेश जोशी | कुडाळ : पैशाच्या देवाणघेवाणीवरून मारहाण आणि अपहरण प्रकरणातील सहा संशयितांपैकी दोघांना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. यातील स्वप्नील भीमराव वसेकर (रा.टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि सोलापूर) याला पंढरपूर येथून तर सुजल सचिन पवार (रा. तेरसे बांबर्डे यास) याला देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान . स्वप्नील वसेकर याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य चार संशयित अजून सापडलेले नाहीत, तसेच या गुन्हयात वापरलेली बोलेरो कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
याबाबत कृष्णा संजय माळी, (रा. दक्षिण सोलापूर, सध्या रा. गुढीपूर कुडाळ) यांनी फिर्याद दिली होती. कृष्णा माळी याला विशांत पांगाम (रा. बांदा, व्यवसाय - बार चालक व हॉटेल चालक) , याने फिर्यादी याच्याकडून ४ लाख येणे असल्यावरून, सुजल पवार (रा. तेरसे बांबर्डे) यास, अन्य 4-5 जणांसोबत बोलेनो व स्विफ्ट गाडीने पाठवून, फिर्यादी यास MIDC कुडाळ येथून जबरदस्तीने सोबत हॉटेल विव्हा गोवा, गोवा येथील हॉटेल मध्ये आणायला लावले, तेथे 4-6 जणांकरवी व स्वतः विशांत पांगाम यांनी हातांच्या थापटाने व लाथ बुक्क्यानी आणि लाकडी काठीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच परत हॉटेल साई प्रसाद, तेरसे बांबर्डे ता. कुंडाळच्या आवारात,आणून सोडून जात असताना, फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेल म्हणून परत, हाताच्या थापटाने व लाथाबुक्क्यानी मारहाण केली होती. हि घटना २३ ऑक्टोबर २०२४ संध्याकाळी ४.३० ते २४ ऑक्टोबर रात्रीच्या कालावधीत घडली होती.
या मारहाण प्रकरणी विशांत पांगम (५०, रा. बांदा), सुजल पवार (२२, रा. तेर्सेबांबर्डे), दिपक वाघमारे (२४, रा. मोहोळ, सोलापूर), विलास वसेकर (२३, रा. मोहोळ, सोलापूर), स्वप्निल वसेकर (२३, रा. मोहोळ, सोलापूर) व अन्य एक अनोळखी इसम यांच्या विरोधात कुडाळ पोलिसात या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता .
कृष्णा संजय माळी यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरून कुडाळ पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात बीएनएस कलम 140(3), 115(2), 118(1), 189(2), 191(2), 190,352,351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच संशयितांची नावे निष्पन्न असून, अन्य अन्य एकाची ओळख पटलेली नाही.
दरम्यान या प्रकरणी स्वप्नील भीमराव वसेकर (रा.टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि सोलापूर) याला पंढरपूर येथून तर सुजल सचिन पवार (रा. तेरसे बांबर्डे) याला देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान . स्वप्नील वसेकर याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली बोलेरो कर देखील ताब्यात घेण्यात आली आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

rapan bottom