Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा उबाठा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की

स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा उबाठा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की

कुंभारमाठ भाजपा बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी सुनावले

मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हा दिखावा आ. वैभव नाईक यांच्या मार्फत दाखवण्यात आला. प्रत्यक्षात या दोघांचाही भाजपाशी संबंध नाही. या दोघीही जणी उबाठा मध्येच कार्यरत होत्या. निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्याच कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश दाखवण्याची वेळ वैभव नाईक यांच्यावर आली असून जनता सुज्ञ आहे. निवडणुकीच्या निकालानंतर वैभव नाईक यांचे पार्सल कणकवलीला परत पाठवणारच अशी प्रतिक्रिया कुंभारमाठ येथील भाजपचे बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी दिली आहे.

वैशाली गावकर यांचा आजपर्यंत एकदाही भाजपाशी संबंध आला नव्हता. अगर त्या राणे समर्थक देखील नव्हत्या. तर वैशाली लंगोटे यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपात बंडखोरी करून सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांची त्याचवेळी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्या उबाठा मध्येच सक्रिय होत्या. पण त्यांनी सरपंच निवडणुकीत उबाठाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवल्याने गावातील उबाठा कार्यकर्त्यानी त्यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला होता. मागील लोकसभा निवडणुकीत या दोघीही जणी उबाठा चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात सक्रिय होत्या. तरीदेखील गावातून खा. नारायण राणे यांना 70 % मते मिळाली. आता निवडणुकीत वैभव नाईकांकडे या भागातून कोणीही नसल्याने असे पक्षप्रवेश दाखवले जात आहेत. मात्र लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना राणे समर्थक असल्याचे लेबल लावण्यात आले. परंतु, या दोघांचाही भाजपा अथवा राणे कुटुंबाशी संबंध नाही. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून ८० ते ९०% मतदान मिळवून देणारच असे श्री. सांगवेकर यांनी म्हटले आहे.

आमदार वैभव नाईक हे मागील दहा वर्षे निष्क्रिय ठरल्याने या निवडणुकीत स्वतःचा पराभव त्यांना समोर दिसू लागला आहे. मागील अडीच ते तीन वर्षांपासून निलेश राणे यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना देखील मतदार संघ पिंजून काढून महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रत्येक गावागावात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याने स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी त्यांच्याकडून गावागावात खोटे पक्ष प्रवेश दाखवले जात असल्याचा आरोप श्री. सांगवेकर यांनी केला आहे.

rapan bottom