मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या पळसंब महिला शाखा प्रमुख पदी सौ. दक्षता सावंत यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत नियुक्तीपत्र शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांनी दिले.
नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार सौ. दक्षता सावंत यांची शिवसेना पक्षाच्या पळसंब, ता. मालवण महिला शाखा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल. तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. असे तालुकाप्रमुख महेश राणे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

