Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या 'स्वर संध्या' ने आणली संगीतमय बहार

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या 'स्वर संध्या' ने आणली संगीतमय बहार

विद्यार्थ्यांनी सादर केली सुमधुर गीते

निलेश जोशी | कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग आयोजित "स्वर संध्या पर्व २ रे " या रमणीय अशा सुरेल संगीताची मैफिल नुकतीच श्री कुडाळेश्वर मंदिर कुडाळ येथे संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी संगीतमय बहार आणली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माणगाव हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध गायक, कीर्तनकार प्रशांत धोंड यांच्या हस्ते झाले. यावेळी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य अरुण मर्गज, प्राचार्य परेश धावडे, प्राचार्य चैताली बांदेकर, प्राचार्या कल्पना भंडारी तसेच महेश कुडाळकर, सुंदर गाळवणकर उभयता आदी मान्यवर उपस्थित होते.
'हे जगदीश सदाशिवशंकरl भवभय हारक दुःख निवारकll' या सुंदर भक्तीमय ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ;तर तू बुद्धी दे तू तेज दे ही प्रार्थना तनया तवटे, स्वरा सापळे, मुग्धा शिरसाट, मान्य शेठ, स्वरा नार्वेकर, प्रज्ञा आचार्य, विना केडगाळे, भार्गवी सडवेलकर व सिद्धार्थ शारबिद्रे,धरीला पंढरीचा चोर- सौम्या नाईक, मी डोलकर डोलकर दर्याचा राजा-सानवी खवणेकर, माझा शिवबा ग सिंहासनावर बसला-मनस्वी तेंडुलकर, श्रवण मेस्त्री, हिमांशू पेडणेकर ,स्वामी समर्थ माझी आई -पूजा आईर, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा(गझल)- संकेत पाटकर,आली माझ्या घरी ही दिवाळी लक्षदीप हे उजळले घरी-सानवी खवणेकर, काळ देहाशी आला धावून- संकेत पाटकर ,देवा तुझ्या नावाचं याड लागलं-शमिका सुकी, मंदिरात अंतरात- हिमांशू पेडणेकर, केशवा माधवा नारायणा- सायलीं वारंग ,मन मंदिरा तेजाने मंदार जोशी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे- मनस्वी खवणेकर, कोणास ठाऊक कसा- अन्वी माने, कश्यपी तांबे, रिया देसाई, स्वरा धुमाळ, जगण्याचे देवा- श्रवण मेस्त्री, यांनी गायलेली अशी विविध बहारदार गीते रसिक प्रेक्षकांची दाद घेऊन गेली.


भक्ती गीते व भावगीतानी ओथंबलेल्या या स्वर संध्या पर्व 2 तील उत्तम उत्तम गाणी एका संगीत ऑर्केस्ट्राला शोभतील अशा दर्जेदार पद्धतीने गायली गेली. कुडाळेश्वर मंदिरातील वातावरण या स्वरसंध्या कार्यक्रमातील गाण्यानी भक्तिमय होऊन गेले होते.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ व श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ यांच्या सहकार्याने व उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने,सचिन कुडतडकर यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली सिंथेसाईजर -महेश तळगावकर, हार्मोनियम साथ- अमित मेस्त्री, पखवाज- युवराज माधव, तबला साथ- रजत गाळवणकर, साईड रिदम- सचिन कुडतरकर व भार्गव चव्हाण यांनी लिलया सांभाळल्यामुळे नवीन कलाकारांची संगीत साथ असूनही एक व्यावसायिक संगीतमय कार्यक्रमातील दर्जेदारपणा जाणवून गेला.

rapan bottom