निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यात निवजे येथे वीज पडून आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.
कुडाळ तालुक्यात आज दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. निवजे येथील सुवर्णा विकास जाधव (वय 28) व मुलगा धृवेश विकास जाधव (वय 3) हे माय लेक जखमी झाले आहेत. त्यांना कुडाळ येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार विभागाच्या आपत्ती विभागातून देण्यात आली.

