Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

खारेपाटण महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून 'दिवाळी विथ माय भारत' सप्ताहाची सांगता

खारेपाटण महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाकडून 'दिवाळी विथ माय भारत' सप्ताहाची सांगता

वैभववाडी | प्रतिनिधी : जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून "दिवाळी विथ माय भारत" सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना, प्रादेशिक संचालनालय, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या कडून "दिवाळी विथ माय भारत - ये दिवाळी माय भारत वाली" संकल्पनाधिष्ठित स्वच्छता, ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सेवा से सिखे अंतर्गत २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान खारेपाटण येथे जनजागृतीसह विविध उपक्रम राबविण्यात आले.


या स्पताह चे उद्घाटन दिनांक २७ ऑक्टोबर रोजी प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या उपस्थित रॅलीद्वारे स्वच्छता जनजागृती करून केली गेली. तत्पशच्यात खारेपाटण गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली गेली. तसेच २८ व २९ ऑक्टोबर रोजी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर आणि खारेपाटण येथील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली गेली. मिळालेल्या निर्देशनानुसार २९ ऑक्टोबर रोजी खारेपाटण प्राथमिक केंद्र येथे प्रमुख डॉ. प्रियांका वडाम - पेडणेकर आणि डॉ. निलोफर जमादार यांच्या उपस्थतीत "सेवा से सेखे - (ई एल पी)" अंतर्गत एनएसएस स्वयंसेवकांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. तर ३० ऑक्टबर रोजी सिंधुदुर्ग ट्रॅफिक पोलिस - महामार्ग वाहतूक पोलीस हवालदार मंगेश कमाने, जोसेफ डिसोजा, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले.यांच्या उपस्थित आणि मार्गदर्शनानुसार ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी सहाय्यक ठरत त्यांनी जनजागृती केली ज्या मध्ये हेल्मेट आणि लायसन्स चे महत्व इत्यादी आदींचा समावेश होता.


या सप्ताह निमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये खारेपाटण सरपंच श्रीमती. प्राची इसवलकर, खारेपाटण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रजाल कुबल, मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी रत्नमाला शेलार, विनिता मोरे, प्रथमेश पाटील, ऋषिल दोंगरकर आणि इतर एनएसएस विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग दर्शिवला.

rapan bottom