पोलीस बंदोबस्त वाढवला
निलेश जोशी | कुडाळ : विधानसभा उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसिलदार कार्यालयाच्या गेटवरच महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. दोन्ही गटातील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व कार्यकार्यकर्त्यांना बाहेर काढले यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते.

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या अर्ज सुनावणी वेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेत त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. ज्याची खोटी सही मारल्याचा आक्षेप होता. त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एक तासाचा वेळा दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र करण्यासाठी संबंधित सूचक तहसीलदार कार्यालयात आले असता प्रांत कार्यालयांचा मुख्य दरवाजातच दोन्ही गट एकमेंकाना भिडले. त्यावेळी सुरुवातीला तिथे कोणी पोलीस सुद्धा उपस्थित नव्हते. काही वेळाने पोलीस आले. मोठा आरडाओरडा ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे देखील आपले चेंबर सोडून त्याठिकाणी तातडीने आल्या. दरम्यान पोलिसांनी सर्वाना बाहेर काढले. त्यानंतर मात्र तहसील कारलेल्याच्या प्रवेशद्वारावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

