Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

निवडणूक निरीक्षकांनी घेतला विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा

निवडणूक निरीक्षकांनी घेतला विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा

सिंधुदुर्ग : भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानुसार निरीक्षकांचे जिल्ह्यात आगमन झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य निरीक्षक श्री प्रविणकुमार थिंड, निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती के.जी. दिव्या, पोलिस निवडणूक निरीक्षक श्री दीपक रंजन यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या सोबत जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

यावेळी निवडणूक निरीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था, स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेली कारवाई, मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे करण्यात येत असलेली जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देणे, गृह मतदान, मतदान केंद्रावर देण्यात येत असलेल्या सुविधा, व्होटर हेल्पलाईन ॲप, सी -व्हिजल ॲप, सुविधा अॅप या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत , खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, अमित मेश्राम, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी श्री रेवणकर आदी उपस्थित होते.

rapan bottom