जुबेर खान | मालवण : मालवण देवबाग येथे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. सरपंच उल्हास तांडेल व ग्रापंचायत सदस्य यांच्यासह सहकारी व कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
प्रवेशकर्ते सरपंच उल्लास तांडेल यांसोबत उपसरपंच घन:श्याम उर्फ तात्या बिलये, रूपा मोंडकर, दत्तात्रय उर्फ अण्णा केळूसकर,
प्रतिक्षा चोपडेकर, धर्मानंद उर्फ नाना तांडेल, एन्जॉय नादार तुळसकर,रुपेश लोंढे तसेच देवबाग मधील शिंदे गट व भाजप कार्यकर्ते यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, बाबी जोगी, मंदार ओरसकर, रमेश कद्रेकर, उमेश मांजरेकर, सरपंच भगवान लुडबे, विनोद सांडव, जेम्स फर्नांडिस, पास्कोल रोड्रिंक्स, सिद्धेश मांजरेकर यांसह अन्य ठाकरे शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

