Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास निवडणूक खर्च निरीक्षक श्रीम दिव्या के.जे., जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे, खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, श्री मेश्राम, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले की, या निवडणूक प्रक्रियेत शासनाचा प्रत्येक विभाग सहभागी होत असून निवडणूक हे एक टीम वर्क आहे. यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचाही सहभाग महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची पूर्वपिठिका प्रकाशित केली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. विविध सार्वत्रिक निवडणूक कालावधीत मतदार जनजागृतीमध्ये माध्यमांचा सहभाग हा महत्वाचा आहे माध्यमांच्या सहभाग आणि सहकार्याशिवाय लोकशाहीच्या बळकटीकरणची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीया यासारख्या माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल.

      जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पूर्वपीठिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये १९७२ ते २०२९ पर्यंतच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, विधानसभा मतदार संघाचे सन २०२४ चे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी महत्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, एकूण मतदार, मतदान केंद्र आदि माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे.

या पूर्वपीठिकेच्या निर्मितीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोल्हापुर विभागाचे माहिती उपसंचालक सुनिल सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पूर्वपीठिकेतील माहिती संकलन व संपादनासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील सतीश कोरे, रवी देवरे, अमित राणे, योगेश वानखेडे, उमेश बेहेकर, शंकर आडेलकर यांनी परिश्रम घेतले.

rapan bottom