Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

निलेश राणेंकडे ३२.७५ कोटीची मालमत्ता

निलेश राणेंकडे ३२.७५ कोटीची मालमत्ता

विविध पोलीस ठाण्यात १० फौजदारी गुन्हे

निवडणूक प्रशासनाची माहिती

निलेश राणे | कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खा. निलेश राणे यांनी कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जंगम व स्थावर अशी मिळून जवळपास ३२ कोटी ७५ लाख रूपये संपत्ती नमुद केली आहे. जिल्ह्यसह परजिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात त्यांच्यावर १० फौजदारी खटले दाखल आहेत अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी गुरूवार दि. २४ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरूवात झाली. सोमवार दि. 28 ऑक्टोबर रोजी निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दाखल केलेल्या अर्जासोबत त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण दाखवले आहे. यामध्ये जंगम मालमत्तेत निलेश राणे यांच्या नावावर 15 कोटी 4 लाख 96 हजार 757 रूपये, पत्नी सौ. प्रियांका निलेश राणे यांच्या नावावर 8 कोटी 62 लाख 56 हजार 831 रूपये, मुलगा अभिराज निलेश राणे यांच्या नावावर 2 कोटी 9 लाख 49 हजार 136 रूपये, हिंदु अविभक्त कुटूंब मध्ये 73 लाख रूपये तर स्थावर मालमत्तेत 6 कोटी 41 लाख रूपये दाखविण्यात आले आहेत. निलेश राणे यांच्यावर 11 कोटी 99 लाख 4 हजार 52 रूपयाचे कर्ज आहे. पत्नी सौ. प्रियांका राणे यांच्या नावावर 4 कोटी 12 लाख 20 हजार 116 रूपयाचे कर्ज असुन हिंदु अविभक्त कुटूंब मध्ये 1 लाख 45 हजार रूपयाचे कर्ज असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
निलेश राणे यांच्यावर जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, चिपळूण, सावर्डे, खेड, सह बीड येथे मिळुन १० फौजदारी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती कुडाळ मालवण विधानसभा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

rapan bottom