Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

वाभवे वैभववाडीत शहरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

वाभवे वैभववाडीत शहरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

(नगरपंचायत राबविणार शहरात जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम)

केंद्र शासनाद्वारे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरावड्यात संपूर्ण देशभर स्वच्छता ही सेवा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, शहर स्वच्छतेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेणे, गेल्या दशकातील स्वच्छ भारत अभियानाचे यश साजरे करणे, शहर विकासात स्वच्छता कामगारांचे योगदान अधोरेखित करणे ही उद्दिष्ट्ये ठेवून हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वच्छ संवाद या कार्यक्रमाचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरातील शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी पर्यावरण अभ्यासक व घनकचरा व्यवस्थापन तज्ञ श्री अनिल चौगुले संवाद साधणार आहेत. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी, शहर स्वच्छतेप्रति एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी इत्यादी विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर या अभियानाच्या अनुषंगाने शहरातील काही भागात तसेच शिक्षण संस्थांमध्ये पथनाट्याचे आयोजनही करण्यात येणार आहे. शहरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व शहर विकासाप्रती तसेच शहर स्वछ्तेप्रती सजगता निर्माण करण्यासाठी स्वच्छ चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आलेले आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्यासाठी QR कोड उपलब्ध करून देण्यात आलेला असून स्पर्धक ऑफलाईन नोंदणीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. चित्रकला स्पर्धा तीन गटात होणार असून; विजेत्यांना सन्मानचिन्ह व बक्षीसही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. या सोबतच वृक्षारोपण (एक पेड मा के नाम), स्वच्छता रॅली, स्वच्छता अभियान अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


शहराच्या स्वच्छतेवर भर देऊन शहराला स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, कचरा मुक्त शहरे तारांकित मानांकन या केंद्र व राज्य शासनाच्या अभियानांमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने व स्वच्छता ही सेवा अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपंचायत प्रयत्नशील असल्याचे मुख्यधिकारी श्री प्रतिक थोरात यांनी मत मांडले व जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ruchira top