Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट

जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लावणार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार - पालकमंत्री नितेश राणे

वैभववाडी : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरातून कचराकुंड्या उभारणार असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा व्यापारी पदाधिकाऱ्यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आभार मानण्यात आले. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांची कणकवली येथे ओम गणेश या निवासस्थानी भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत पदाधिकाऱ्यांनी नामदार नितेश राणे यांच्याशी प्रदिर्घ चर्चा केली.

ओसरगाव येथील टोलमधून सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना वगळण्यात येणार असे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर महासंघाच्या कार्यालयासाठी भुखंड देण्याचेही त्यांनी आश्वासित केले. कचरामुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्हा नियोजन मधून सर्व बाजारपेठांसाठी कचरा कुंड्या देण्यात येणार आहेत.

संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठेंच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. परप्रांतिय व्यापारी रोखण्यासाठी फिरत्या व्यापार्यांना महासंघातर्फे ओळखपत्रे देण्यात यावीत अशी सुचना राणे यांनी पदाधिकारी यांना केली. जिल्ह्यातील व्यापार उद्योग वाढण्याचा दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. दर तिन महिन्यांनी महासंघाच्या कार्यकारिणीसोबत बैठकीचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.



यावेळी महासंघाचे अध्यक्ष संजयजी सावंत, कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घूर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष भोगले साहेब, उपाध्यक्ष अवधुत शिरसाट, उपाध्यक्ष पुंडलीक दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष पी‌ .डी.शिरसाट, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जगदिश मांजरेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, प्रकाश वाळके, हर्षल बांदेकर, राजेंद्र पिसे आदि महासंघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

ruchira top