Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आचिर्णेत साकारणार बोटानिकल गार्डन ; 1 कोटींचा निधी

आचिर्णेत साकारणार बोटानिकल गार्डन ; 1 कोटींचा निधी

पालकमंत्री नितेश राणे यांची नाविण्यपुर्ण संकल्पना

दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प ठरणार महत्त्वाचा केंद्रबिंदू

प्रकल्पामुळे वैभवाडीच्या वैभवात पडणार भर

वैभववाडी प्रतिनिधी :
निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान) आचिर्णे येथे साकारण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष म्हणूनही नितेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आचिर्णे येथे सुमारे अडीच एकर क्षेत्रात हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, तळकोकणातील विविध औषधी वनस्पतींची माहिती नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उद्यानात दुर्मिळ आणि उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार असून, त्यासोबतच पर्यटक, अभ्यासक आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध वनस्पतींची ओळख, त्यांचे संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तळकोकणातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील संशोधक, शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांना या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे वैभववाडी तालुक्याच्या पर्यटन, पर्यावरण आणि शैक्षणिक विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

वैभववाडी तालुक्यात अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण प्रकल्प मंजूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे वैभववाडीच्या वैभवात भर पडण्याबरोबरच तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

या बोटानिकल गार्डन (वनस्पती उद्यान ) चे भूमिपूजन लवकरच कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

ruchira top