मोहन सायकल स्टोअर यांचे आयोजन
मालवण : मोहन सायकल स्टोअर आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित भव्य खुली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रेवतले महापुरुष मैदानावर या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
मालवण रेवतळे येथे मोहन सायकल स्टोअर आयोजित , सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित भव्य खुली एक गाव एक संघ पावसाळी रबर बॉल स्पर्धा आयोजित केली आहे.दिनांक १७ व १८ ऑगस्ट रोजी या स्पर्धा होणार असून यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५१,००० रुपये असून , विजेत्यांना अन्य आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेची प्रवेश फी ३,००० रुपये असून पहिल्या १६ संघाना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा पाच षटक सामना असून १ षटक, १ गोलंदाज वापरता येणार आहे. अधिक माहितीसाठी शेखर मांजरेकर ९४२०४२७४४७, सुनील मालवणकर ८१०४७२७३१० यांच्याशी संपर्क साधावा.

