रेवंडी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात
मालवण : भारताच्या 78 व्या स्वातंत्रदिनानिमित्त ग्रामपंचायत रेवंडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत रेवंडी येथे 40 वर्षे कार्यरत असलेले पाणीपुरवठा कर्मचारी लक्ष्मण सखाराम कांबळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच अमोल अनिल वस्त, उपसरपंच सौ. श्रध्दा वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता कांबळी, सदस्य प्रणय तळाशिलकर, सदस्य संतोष कांबळी, पोलीस पाटील मनोदया मनोज कांबळी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय कांबळी, शिक्षिका गौरी केणी, शिक्षिका दिपाली शिंदे, अं. सेविका रिया कांबळी, अं. सेविका सौ. साधना पराडकर, मदतनिस, सौ. अस्मिता कांबळी मदतनिस सौ. निकिता कांबळी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

