मालवण : मालवण तहसीलदार कार्यालयीन दस्तऐवजा प्रमाणे ३८५ एकर जमिन ही शासनाची दाखवलेली आहे. ती सर्वे नंबरसहीत, ती जमिन आपल्या ताब्यात आहे का? याबाबत खुलासा करण्यात यावा. यासह अन्य विषयावर छत्रपती शिवाजी महाराज महाराज्व समाधान शिबीरात काही मुद्देवर आचरे ग्रामस्थाना चर्चा करावयाच्या आहेत. या मुद्यांची आगाऊ माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागामार्फत मालवण तहसीलदार यांना निवेदना द्वारे देण्यात आली.
मालवण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच, विभागीय संघटक, आचरा, मंगेश टेमकर, आचरा विभाग प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी, समिर लब्दे, माणिक राणे, श्याम घाडी, उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आचरा गांव १९७४ साली नायब तहसिलदार कुळ वहिवाट वर्ग ७ च्या अधिकाऱ्याने पूर्ण आचरा महसुली गांव व गाऊडवाडी महसुली गांव यामधील कोणत्याही खातेदाराला कोणतीही सुचना न देता श्री देव रामेश्वराची नोंद घालण्यात आलेली आहे. ती नोंद कुठल्या कागदपत्रांच्या आधारे घालण्यात आलेली आहे ? भविष्यात आचरा गावातून सागरी महामार्ग जात आहे. सदरची भू-संपादन प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सध्या गावातील वस्तुस्थिती पाहता जमिनीला ३ मालक (कुळ, वरिष्ठ कब्जेदार व कनिष्ठ कब्जेदार) आहेत. त्यामुळे भू-संपादनाचा मोबदला कोणाला व किती मिळणार? गांव नमुना ३ हा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी २००५ मध्ये तयार केला आहे. हा मुळ गांव नमुना ३ हा आपल्याकडे आहे की नाही? देवस्थान इनाम जमिन मुळ दस्तऐवज यावरती सर्व्हे नंबरची नोंद असणारे आपल्याकडे उपलब्ध आहेत का? याचा आपण खुलासा करावा. (एलिनेशन रजिस्टर, बोटखत, सनद, गांव नमुना ३ यांच्यावर सर्व्हे नंबरचा खुलासा आहे का? आचरा गावातील शेतकऱ्यांना फार्मर आय. डी. कुळ असल्यामुळे मिळत नाहीत. सदरची चुकी ही शेतकऱ्याची आहे की आपली आहे? या कार्यक्रमासाठी साऊंड सिसटीमची सोय करण्यात यावी. जेणेकरून जी चर्चा होईल ती सर्व ग्रामस्थांना समजली जाईल. आचरा ग्राम महसुल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज्व समाधान शिबीरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागामार्फत यासह अन्य विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या बाबत आगाऊ सुचना मालवण तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

