Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

दणका | प्रत्यक्ष पाहाणी आणि कारवाईचे आदेश

दणका | प्रत्यक्ष पाहाणी आणि कारवाईचे आदेश

सर्व विकासकामे दर्जेदार पद्धतीने करून घ्यावीत

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या प्रशासनास सक्त सूचना

निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार

मालवण : मालवण शहरातील मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवर करण्यात आलेले रस्ता काँक्रिटिकरण काम निकृष्ट झाले आहे. या बाबत नागरिकांच्या तक्रारीनुसार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर व नगरसेविका मेघा सावंत यांनी प्रत्यक्ष पाहाणी केली. सर्व ठिकाणी काँक्रिट उखडले असून धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून पुन्हा दर्जेदार पद्धतीने काँक्रिटिकरण करण्याचे आदेश बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी बांधकाम प्रशासनास दिले आहेत.

निवडणूक पूर्वी हे काम करण्यात आले. अवघ्या काही महिन्यात काँक्रिट उखाडले. या मार्गांवरून वाहने गेल्यानंतर पुर्ण सिमेंट माती उडून धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्राप्त तक्रारीनुसार बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक महेश कांदळगावकर, पालिका अभियंता राजा केरिपाळे आदी उपस्थित होते.

लाखो रुपये खर्च करून केलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर अशा कामांचा उपयोग काय? कामे होत असताना प्रशासनाने या कामांवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. निकृष्ट कामे होत असतील तर जनतेला सुविधा मिळणार कशा? अश्या स्वरूपात स्पष्ट नाराजी व्यक्त करतं या संबंधित कामाच्या ठेकेदाराला तात्काळ नोटीस काढून योग्य पद्धतीने काम पूर्ण करून घ्यावे. असे आदेश बांधकाम सभापती सहदेव बार्डेकर यांनी दिले आहेत.

शहरातील सर्व कामांची पाहणी केली जाईल. काम दर्जेदार असले पाहिजे. निकृष्ट कामे आढळल्या अशा ठेकेदारांना काळा यादीत टाकण्याबाबतही निर्णय घेतला जाईल. जनतेच्या पैशातून जनतेसाठी होणारी कामे ही दर्जेदारच असली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. असे सहदेव बापार्डेकर यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत प्रशासनाला पुढील कार्यवाही तात्काळ करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom