Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवण नगरपरिषद प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापतीपदी सहदेव बापर्डेकर

मालवण नगरपरिषद प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापतीपदी सहदेव बापर्डेकर

नगरपरिषद स्थायी समिती व विषय समिती निवड

उपनगराध्यक्ष दिपक पाटकर पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती

नगरसेविका पूनम चव्हाण स्वच्छता व आरोग्य सभापती

नगरसेविका अन्वेषा आचरेकर महिला व बालकल्याण सभापती

उपसभापती पदी नगरसेविका अश्विनी कांदळकर

नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा

मालवण : मालवण नगरपरिषद स्थायी समिती तसेच बांधकाम, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा तसेच महिला बालकल्याण समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापती निवड बिनविरोध झाली आहे. नगराध्यक्षा ममता वराडकर स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. तर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती (पदसिद्ध), नगरसेवक सहदेव बापार्डेकर प्रतिष्ठेच्या सार्वजनिक बांधकाम सभापती, नगरसेविका पूनम चव्हाण स्वच्छता वt आरोग्य सभापती, नगरसेविका अन्वेषा आचरेकर महिला व बालकल्याण सभापती तर उपसभापती म्हणून नगरसेविका अश्विनी कांदळकर यांची निवड झाली आहे.

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात स्थायी समिती सदस्य व सभापती, उपसभाती निवड बाबत चर्चा झाली होती. आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात नावे निश्चित करण्यात आली. त्यानुसार गटनेत्या पुनम चव्हाण यांनी नावे सादर केली.

बुधवारी मालवण नगरपरिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी पिठासीन अधिकारी प्रतीक थोरात यांनी काम पाहिले. समिती व सदस्य नावे निश्चिती तसेच सभापती व उपसभापती निवडणूक, निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक पुनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, महेश कांदळगांवकर, अन्वेशा आचरेकर, मंदार केणी, ललित चहाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, रविकिरण तोरसकर, सुदेश आचरेकर, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर आदी उपस्थित होते.

मालवण नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व स्थायी समिती आणि सभापती निवडीत दिसून आले. मित्रपक्ष भाजपालाही या समितीत स्थान देण्यात आले आहे. महायुती म्हणून निवड झाली. विषय समितींमध्ये पाच सदस्य निश्चीत करण्यात आलेले आहे. तर पाच सदस्यीय स्थायी समिती निश्चीत करण्यात आलेली असून या समितीचे अध्यक्षपदी नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्याकडे असणार आहे.

शिवसेना गटनेत्या सौ. पूनम चव्हाण यांनी पाच सदस्यीय स्थायी समिती गठीत करण्याची सूचना केली. याला सर्व सभागृहाने मान्यता दिली. तसेच विषय समितीही चार गठीत करण्यात याव्यात असेही सौ. चव्हाण यांनी सांगितल्या. यात सार्वजनिक बांधकाम समिती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, महिला बालकल्याण समिती अशा समित्यांची नावे सुचविली. तसेच पाणी पुरवठा समिती सभापती हे उपनगध्यक्ष दिपक पाटकर पदस्थिती सभापती असतील असेही स्पष्ट केले. विषय समिती निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष ममता वराडकर आणि मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक यांनी सर्व समिती सभापती आणि सदस्य यांचे अभिनंदन केले. शिवसेनेला तीन, भाजपला एक आणि ठाकरे गटाला एक असे विषय समितीवर सदस्य आहेत. शिवसेनेच्या सदस्यांची नावे गटनेत्या पूनम चव्हाण यांनी तर भाजपच्या सदस्यांची नावे गटनेत्या अन्वेषा आचरेकर यांनी तर ठाकरे गटातील सदस्यांची नावे गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी सादर केली.

सर्व विषय समित्या

सार्वजनिक बांधकाम समिती सहदेव बापर्डेकर (सभापती), सदस्य मेघा सावंत, महेश कोयंडे, मंदार केणी, मंदार ओसरकर. पाणी पुरवठा समिती -दिपक पाटकर (सभापती), सदस्य शर्वरी पाटकर, मेघा सावंत, ललीत चव्हाण, तपस्वी मयेकर. आरोग्य व स्वच्छता समिती पूनम चव्हाण (सभापती), सदस्य सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर, अनीता गिरकर महिला बालकल्याण समिती अन्वेषा आचरेकर (सभापती), अश्विनी कांदळकर (उपसभापती), सदस्य भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, अनीता गिरकर.

पालिका स्थायी समिती

स्थायी समिती अध्यक्ष ममता वराडकर, सदस्य दिपक पाटकर, सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर. अशी असणार आहे. शिवसेना भाजपा महायुतीच्या माध्यमातून एकसंघ आणि सर्व सदस्य यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पार पडली.

पर्यटन नगरी मालवण शहराला उंचावर नेऊ : पूनम चव्हाण

आमदार नीलेश राणे यांनी दाखविलेल्या विश्वास सार्थ करण्यासाठी आपण सदैव जनसेवेसाठी काम करणार आहे. दर्जेदार शहर स्वच्छता ते आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. शहरवासियांनी भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव मला असून त्यातून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे. पर्यटन नगरी मालवण शहर अधिक सक्षम बनवताना सर्वांच्या सहकार्यातून मालवण शहराचा सर्वांगीण विकास करत मालवण शहर वेगळ्या उंचीवर नेले जाईल. खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून अधिकाधिक विकास हेच आपले प्राधान्य राहणार आहे. एक दर्जेदार मालवण शहर बनवले जाईल. असा विश्वास आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पुनम चव्हाण यांनी व्यक्त केला.

तरुणांच्या हाती कारभार

मालवण नगरपालिकेमध्ये विषय समिती निवडीमध्ये तरूण सदस्यांना आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात संधी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने मालवण नगरपालिकेमध्ये तरूणांची सत्ता आलेली आहे. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन प्रशासकीय कारभार होईल. असे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. नगरसेवक सुदेश आचरेकर यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिडये, उपाध्यक्ष अभय कदम, महेश सारंग, गणेश परब, उमेश बिरमोळे, दिलीप बिरमोळे, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, मोहन वरराडकर, भाई मांजरेकर, सूर्यकांत फणसेकर, बाप्पा तळाशिलकर, तेजस लुडबे, अजित आचरेकर, सुनील खांदारे, संतोष खांदारे, सोनू खांदारे, संजय नार्वेकर, संदीप गावकर, सेलेस्तिन फर्नांडिस, नागेश परब, गीता बापर्डेकर, पारितोषिक बापर्डेकर, हिमांशू बापर्डेकर, रणजित खांदारे, रोहित कवठकर, फ्रँसीस नरोना, दादा चिंदरकर, बंटी खांदारे, रूपा बिडये, गौरी खांदारे, अनिल कांदळकर, तेंजेंद्र पेडणेकर, आशिष चव्हाण, संचेत गांवकर, ओंकार पांगे, सागर खराडे, पपा कांबळी, विशाल मोडक, अमोल राणे यासह राजकोट मित्रमंडळ सदस्य, मालवण नगरपरिषद कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. अभिनंदन वर्षाव यावेळी करण्यात आला.

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर

मालवण नगरपरिषदेतील प्रतिष्ठेच्या सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सहदेव बापर्डेकर यांनी सर्वांचे आभार मानले. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे बांधकाम सभापती
सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, आमचे आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही सहदेव बापर्डेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. माझ्या राजकोट, मेढा प्रभाग सहा मधील मतदार व नागरिक यांनी नगरसेवक म्हणून मला विजयी केले त्यामुळेच आज मी मालवण शहराचा बांधकाम सभापती झालो आहे. यासोबतच नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व सर्व सहकारी नगरसेवक तसेच मालवण शहर वासियांचेही सहदेव बापर्डेकर यांनी आभार मानले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शना मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत. मालवण शहरातील जनतेला बांधकाम विभागाच्या माध्यमातून जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom