Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या १२ फेब्रुवारीच्या संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही.

राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या १२ फेब्रुवारीच्या संपात भारतीय मजदूर संघ सहभागी नाही.

भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव - हरी चव्हाण

मालवण | प्रतिनिधी : १२ फेब्रुवारी रोजी देशातील अन्य कामगार संघटनांनी व संयुक्त किसान मोर्चाने विरोधासाठी विरोध म्हणून राजकिय दृष्टीने प्रेरित असा संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा नसून, मजदूर संघ संपात सहभागीही होणार नाही. भारतीय मजदूर संघ, राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी होत नाही. कारण कामगार क्षेत्राला राजकीय स्वार्थां पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच कामगारांनी या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी केले आहे.

भारतीय मजदूर संघ केंद्र सरकारच्या चार श्रम संहितांचे स्वागत करते. तथापि त्यापैकी दोन संहितान मधील काही तरतुदीं विषयी मजदूर संघाने आपल्या हरकती व चिंता केंद्र सरकार जवळ व्यक्त केली आहे. मजदूर संघाने स्पष्ट केले आहे की, वेतन व सामाजिक सुरक्षा संहिता या ऐतिहासिक व क्रांतिकारी आहेत, तर उर्वरित दोन संहितां मधील काही तरतुदीं विषयी भारतीय मजदूर संघाला चिंता आहे. या सर्व मुद्यांवर १३ व २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय मजदूर संघ व केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांच्यात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर श्रम मंत्र्यांनी मजदूर संघाने मांडलेल्या हरकतींवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय भारतीय मजदूर संघाने कामगार क्षेत्राशी संबंधित इतर अनेक मागण्या सरकारसमोर मांडल्या असून, त्यावर योग्य विचार करून तोडगा काढण्याचे आश्वासन श्रम मंत्री मांडविया यांनी दिले असल्याची माहिती भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दिली.
भारतीय मजदूर संघ सरकारांच्या सकारात्मक व कामगार हितैषी धोरणांना सातत्याने पाठिंबा देत आला आहे. तसेच कामगारांच्या हितांच्या विरोधात असलेल्या धोरणांचा ठामपणे विरोध करून त्याबाबत आपल्या हरकती मांडत राहिला आहे. भारतीय मजदूर संघ राजकीय प्रेरणेतून होणाऱ्या आंदोलनांमध्ये सहभागी होत नाही. कारण कामगार क्षेत्राला राजकीय स्वार्थां पासून दूर ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच मजदूर संघ व संलग्न संघटनांनी १२ फेब्रुवारीच्या राजकीय दृष्ट्या प्रेरित असलेल्या संपाला पाठिंबा दिलेला नाही व त्यात सहभागी होणार नाही. तसेच या संपात कोणी कामगारांनी सहभागी होऊ नये असे आवाहन हरी चव्हाण यांनी केले आहे.

rapan bottom