Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी कॅडेट्स बाजीराव काळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सन्मान!

सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी कॅडेट्स बाजीराव काळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सन्मान!

मालवण | प्रतिनिधी: मालवण स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभागाचा माजी एनसीसी कॅडेट श्री.बाजीराव काळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. बाजीराव काळे हा अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेमार्फत सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे .शासन, प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून सामान्य लोकांचे प्रश्न शासन दरबारी मांडलेले आहेत. शाळेतील मुलांना संविधान समजावे म्हणून संविधानाची ७५ वर्षे या कार्यक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ शाळा व १०५०० विद्यार्थ्यां पर्यंत संविधान पोहचविले.संविधान विषयावर १०० अधिक व्याख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिली.

शालेय मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न व पाठपुरावा करत आहे. समाजात सामाजिक सद्भाव व एकता निर्माण व्हावी यासाठी गेली महाकुंभ तीर्थ दर्शन कार्यक्रम करून समाजातील वंचित, शोषित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. अनाथ व एकल पालक असलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. तरूणांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाच्या योजनेतून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. शाळेतील मुलांना गुरूंचे महत्त्व कळावे म्हणून गुरू वंदना कार्यक्रम करून विद्यार्थी व गुरू यांचे नाते सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले.

अशा समाजातील विविध विषयांवर काम करून सबल समाज, समरस, समृद्ध समाज निर्मितीसाठी प्रयत्न केल्याबद्दल हा सत्कार सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात समाजासाठी काम करणाऱ्या २१ तरुणांनचा करण्यात आला. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणातील तीनव्यक्ती पैकी श्री. बाजीराव शंकर काळे हे आहेत.

मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम आर खोत कॉलेजचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते सर यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर साहेब कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सह सेक्रेटरी संदेश कोयंडे कोषाध्यक्ष नंदन देसाई संचालक ॲडवोकेट समीर गवाणकर, डॉक्टर शशिकांत झांटये, डॉ रामचंद्र काटकर , महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत विजय केनवडेकर त्याचबरोबर इतर पदाधिकारी या सर्वांनी श्री. बाजीराव काळे याचे अभिनंदन केले. एन सी सी चे सर्व कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस प्रमुख जगताप साहेब, मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनी अभिनंदन केले. ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर तामिळनाडू , लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक .सुभेदार मेजर सुधाकर कुलदीप कर, सुभेदार यांनी त्याचे कौतुक केले.

श्री. बाजीराव काळे यांनी अपार कष्ट मेहनत घेऊन आपलं शिक्षण त्याने पूर्ण केले आहे. त्याचबरोबर त्याने एनसीसी पूर्ण केलेले आहे एनसीसी मध्ये त्याने सीनियर ची भूमिका बजावलेली आहे त्यामुळे त्याला लीडरशिप कशी करायची याचा पूर्ण ज्ञान एनसीसी मार्फत मिळाले आहे. त्यामुळे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने नेतृत्वाची भूमिका पार पाडत आहे असे असोसिएट एनसीसी ऑफिसर राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.मल्लेश खोत यांनी सांगितले. म्हणून एनसीसी ही शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित करणारी त्याचबरोबर देशाच्या संरक्षण दलामध्ये नोकरी देणारी एक सुवर्णसंधी आहे आणि त्याचा मालवण वासियाने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यानी कॉलेज करत असताना एनसीसी साठी सुद्धा प्रवेश घ्यावा. जेणेकरून आपल्या आयुष्यात नवीन बदल होईल त्यामुळे मालवण तालुक्यातील मधील नागरिकांनी सुद्धा एनसीसी बाबत जनजागृती करावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी एनसीसी कडे पाठवून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवावे त्याचबरोबर मालवणचा तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देखील नावलौकिक करावा अशा प्रकारचे वक्तव्य मल्लेश खोत यांनी केलेले आहे.

rapan bottom