Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

अपघात | मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार

अपघात | मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार

कुंभारमाठ येथे सुमोची धडक

मालवण : मालवण कुंभारमाठ येथे टाटा सुमो गाडी आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात सचिन नारायण राठोड (रा. मालवण) हा २५ वर्षीय युवक जागीच मयत झाला. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी सुमो चालक देवप्पा श्रीमंत करपे (वय २५, रा. विजापूर कर्नाटक) याच्यावर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मयत सचिन राठोड याचा भाऊ किरण नामदेव राठोड याने मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मार्गावर कुंभारमाठ येथे म्हाडा कॉलनी तिठ्यावर भरधाव वेगात येणाऱ्या टाटा सुमो (MH-08-Z- 8010) या गाडीने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मोटारसायकलस्वार सचिन राठोड याला जोरदार धडक दिली. सचिन राठोड रस्त्यावर कोसळून डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

सुमो चालक देवप्पा करपे हा दारू पिऊन भरधाव वेगात गाडी चालवून मोटरसायकलला धडक दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. फिर्यादीनुसार सुमो चालक देवप्पा करपे याच्यावर सचिन राठोड याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम १०६, १२५ (a), १२५ (b), २८१, मोटर वाहन कायदा कलम १८४, १८५ अन्वये मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे हे अधिक तपास करत आहेत.

rapan bottom