Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

जगभरात महती आंगणेवाडी श्री भराडी देवीची!

जगभरात महती आंगणेवाडी श्री भराडी देवीची!

वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांचे प्रतिपादन

चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी घेतले मित्रपरिवारासह आई भराडी देवीचे दर्शन

मसुरे | आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला आहे. कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या या आंगणेवाडीत येऊन भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याचा योग आज लाभला. एरवी बातम्यामध्ये या जत्रेची महती पाहत होतो, वाचत होतो. पण आज प्रत्यक्ष येथे येण्याचा योग आला. लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहणाऱ्या आंगणेवाडी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन आंगणे मंडळाने केले आहे असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आंगणेवाडी येथे बोलताना केले.


अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी मंगळवारी सायंकाळी आंगणेवाडी यात्रेला भेट देऊन श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि आंगणे कुटुंबीयांतर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोट सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी, हडपिड मठ अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर,खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, बाबू आंगणे, स्वामीभक्त व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रघुनाथ आंगणे, दाजी सावजी, सचिन लोके, दीपक आंगणे, सौ. नीलम पेडणेकर, श्री पितळे, समीर आंगणे, आबा आंगणे, प्रसाद आंगणे, दिनेश आंगणे, सौ लता पालयेकर, राजेश पारधी तसेच इंगळे यांच्या समवेत प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, बाबा सुरवसे, सुरेश वाले सर बाबासाहेब निंबाळकर, विश्वनाथ देवरमनी आदीसह विश्वस्त उपस्थित होते.


यावेळी महेश इंगळे म्हणाले, आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्वयंभू असे स्थान आहे. भराडी देवीची व तिच्या यात्रेची महती जगभरात पसरली आहे. अशा यात्रेला उपस्थित राहून समाधान वाटले. सर्वांच्या सुख शांती साठी भराडी चरणी गाऱ्हाणे घातले आहे. श्री स्वामी समर्थ आणि कोकणचे जुने नाते आहे. स्वामी समर्थ यांचे कोकणातही वास्तव्य होते. अशा पावन भूमीत येण्याचा आज योग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वामी समर्थांच्या विविध मठांना आपण भेटी देत आहोत. कोकणातून दरवर्षी बहुसंख्य स्वामी भक्त अक्कलकोट येथे भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतात. श्री भराडी देवी व श्री स्वामी समर्थ यांचा कृपाशिर्वाद सर्वांवर कायम रहावा असेही महेश इंगळे म्हणाले.

आंगणेवाडीच्या पुण्य भूमीत आज अक्कलकोटच्या पावन भूमितील स्वामी दुतांचे आगमन झाले आहे. आई भराडी देवी प्रमाणे स्वामी समर्थांचे आशीर्वाद सर्व भक्तांच्या पाठीशी राहोत असे यावेळी बोलताना बाबू आंगणे म्हणाले. यावेळी हडपिड मठाच्या वतीने सन्मानचिन्ह आणि स्वामी कृपा वस्त्र अध्यक्ष छोटू आंगणे यांना प्रदान करण्यात आले. तसेच वटवृक्ष देवस्थान च्या वतीने आंगणे कुटुंबियांना स्वामी समर्थ फोटो आणि कृपावस्त्र आणि कृपा प्रसाद भेट देण्यात आला. यावेळी भाजप उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी महेश मालक इंगळे यांचे आशीर्वाद घेत ते सलग सहा टर्म नगरसेवक झाल्याबद्दल सत्कार केला. आभार बाबू आंगणे यांनी मानले.

rapan bottom