Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

“कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”

“कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा

आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती

मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल

आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू


कणकवली : मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल मागवण्याचे निर्देश दिले असून, लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली आंबा बागायतदारांची बैठक घेऊन मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,अशी ग्वाही मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली असून ते म्हणाले,राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी मध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली. एकंदरीत आंबा- काजू ची परिस्थिती अशी आहे की या वर्षीचा हंगाम पाहता आंबा गळून पडला आहे. याबाबत ची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पूर्ण मंत्रिमंडळासमोर मांडली. माझे म्हणणं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्रालयाचे सचिव आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या परिस्थिची माहिती घेण्यास सांगितली आहे. या एकंदरीत अभ्यासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आंबा बागायतदारांच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर घेतली जाईल. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टीकोनातून निर्देश दिलेले आहेत.

राज्य सरकार म्हणून आंबा बागायतदारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत.लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेल आहे. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

rapan bottom