Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

बजरंग दल सिंधुदुर्ग तर्फे आयोजित रील्स स्पर्धेचा उद्या आंगणेवाडीत बक्षीस वितरण सोहळा

बजरंग दल सिंधुदुर्ग तर्फे आयोजित रील्स स्पर्धेचा उद्या आंगणेवाडीत बक्षीस वितरण सोहळा

मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्मावरील विविध आव्हाने आणि सामाजिक प्रश्न यावर जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'रील्स' स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेतील मंदिराशेजारी उभारण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे.

या सोहळ्यात राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश राणे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री मोहन सालेकर उपस्थित राहणार आहेत.

लव्ह जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद यांसारख्या विषयांवर आणि हिंदू समाजामध्ये धर्मांतराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी या अनोख्या 'रील्स' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून युवकांनी आपल्या कलागुणांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अजित फाटक, सुभाष पुराणिक, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कृष्णा धुळपणवार, आनंद प्रभू, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, धर्मप्रसार प्रमुख अविनाश सामंत, मालवण प्रखंड बजरंग दल संयोजक गणेश चव्हाण, मालवण प्रखंड मंत्री अमोल गावडे व इतर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या बक्षीस वितरण सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

rapan bottom