Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

जत्रोत्सवा साठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सज्ज !

जत्रोत्सवा साठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सज्ज !

पहाटे ३ वाजता सुरु होणार देवीचे दर्शन

▪️९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक

▪️अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन

▪️रात्री ९ ते १२ पर्यंत दर्शन रांग धार्मिक विधिसाठी बंद

मालवण : नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. भाविक हा केंद्रबिंदू मानून देवीच्या सुलभ आणि तत्पर दर्शनासाठी अतिशय योग्य आणि सुसज्ज नियोजन करून आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि प्रशासन सज्ज झाले आहे. जत्रोत्सवा दिवशी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता भाविकांसाठी देवीचे दर्शन सुरू होणार असून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर रात्री नऊ ते बारा धार्मिक विधींसाठी भाविकांना देवीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. उतररात्री १ नंतर पुन्हा देवीचे दर्शन सुरू होणार आहे. १० फेब्रुवारी मोड जत्रे दिवशी सायंकाळी ७ वाजे पर्यंत भाविकांना देवीचे दर्शन होणार आहे अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी आंगणेवाडी येथे दिली.

जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन श्री भराडी देवी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे सचिव काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, बाबू आंगणे आदी उपस्थित होते. जत्रोत्सव उत्साहात संपन्न होत असताना भाविकांचे सहकार्य नेहमीच लाभाते. गतवर्षीच्या नियोजनात काही बदल यावर्षी करण्यात आले असून भाविकांना अधिक सुलभ दर्शन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. भविकांना एकूण नऊ दर्शन रांगांद्वारे दर्शन मिळणार आहे. तसेच महनीय व्यक्तींसाठी वेगळी दर्शन रांग असणार आहे. मात्र भाविकांच्या ९ दर्शन रांगा मध्ये कोणताही खंड पडणार नाही याचे खास नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा जत्रोत्सव हा प्रशासनाच्या आवाहनानुसार प्लास्टिक मुक्त जत्रोत्सव असणार असून त्यादृष्टीने आम्ही सुद्धा नियोजन केलेले आहे.

राज्यात महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्याने विजयी नगरसेवक सुद्धा आई भराडीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजय उमेदवार सुद्धा सोमवारी आई भराडीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे होणारी अधिक गर्दी लक्षात घेता त्यादृष्टीने सुद्धा नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी बाबू आंगणे यांनी दिली.

आंगणे कुटुंबीय गेले ३ महिने यात्रा नियोजन तयारी दृष्टीने मेहनत घेत आहेत. शासनाकडून फार मोठे सहकार्य मिळत आहे. पालकमंत्रि नितेश राणे यांनी सुद्धा नियोजन बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे काम पूर्ण होत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी सुद्धा आपल्या विभागाना आवश्यक सूचना केल्या आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नऊ टँकर उपलब्ध होणार आहेत. ग्रामपंचायत, वीज वितरण कडून रस्ता लाईट साठी ९ पोल नव्याने उभारण्यात आले आहेत. पार्किंग ठिकाणी अल्प शुल्कात वाहने पार्क करण्यात येतील. दुकान व्यवस्था सुद्धा प्रशासनाच्या मागणी नुसार केली आहे. व्यावसाईकांचे नुकसान होऊ नये यासाठी दखल घेण्यात आली आहे. रिक्षा व्यवसाईक यांचा सुद्धा व्यवसाय व्हावा यासाठी स्टॅन्डचे नियोजन केलेले आहे. अपंगां साठी कणकवली मालवण दिशेने वाहतुकीसाठी वाहन असणार आहे. स्वयंसेवक सुद्धा सोबत असणार आहेत. सर्व सामान्य भाविकाला अर्ध्या तासात दर्शन मिळेल असे नियोजन आहे. मुख दर्शन साठी वेगळी लाईन मधून पाच मिनिटात दर्शन होणार होणार आहे. ग्रामस्थांचे पाचशे स्वयंसेवक तर पंढरपूर मधील शंभर स्वयंसेवक भाविकांना सेवा देणार आहेत. भाविकांनी सर्व सूचनांचे पालन करून जत्रोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom