Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

मालवण तालुक्यात सरासरी 59 टक्के मतदान

मालवण तालुक्यात सरासरी 59 टक्के मतदान

6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती जागा : 111 मतदान केंद्रावर मतदान : 9 फेब्रुवारीला मतमोजणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी 55 ते 60 टक्के मतदान झाले आहे. तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती मतदारसंघांसाठी सर्व 111 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती सदस्य जागा मधील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आडवली पंचायत समिती या जागी यापूर्वीच भाजपा महायुतीच्या सीमा परुळेकर बिनविरोध झाल्याने तिथे निवडणुक झाली नाही.

सर्व मतदान केंद्रावर सकाळी 7:30 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्तात मतदान सुरु झाले.
सकाळी 9:30 वाजेपर्यंत 9.29 टक्के मतदान झाले. दुपारी 11:30 वाजेपर्यंत 23.63 टक्के मतदान झाले. तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 37.61 टक्के मतदान झाले. दुपारी 3:30 वाजेपर्यंत 47.30 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी 5:30 पर्यत सरसरी 55 ते 60 टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्र ठिकाणी 60 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले.

ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक विभाग निवडणुक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने नियोजन केले होते. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तसेच तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. सर्वच मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे संपूर्ण तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली.


निवडणुक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण हे तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून होते.

अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी गोळवण येथील आदर्श मतदान केंद्र तसेच सर्जेकोट येथील सखी मतदान केंद्र येथे भेट देऊन आढावा घेतला.

९ फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom